लेखक व्हा आणि समृद्धी मिळवा


....प्रत्येकाच्या आत एक लेखक दडलेला आहे . आपण त्या कडे लक्ष देत नाही . आपण त्या लेखकाला प्रकट केले तर ? किती छान होईल . तुम्हाला व्यक्त होण्यास एक व्यासपीठ मिळेल . तुम्ही लेखन कला एकदा आत्मसात केली की प्रगतीची असंख्य दरवाजे उघडतील . प्रसिद्धी सोबत समृद्धी देखील मिळेल . मी तुमच्यातील झोपलेल्या लेखकाला जागे करण्यास येत आहे
तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन येत आहे .तयार आहात ना तुम्ही ? " लेखक व्हा आणि समृद्धी मिळवा " या विषयावर मराठीत फ्री वेबिनार आयोजित केले आहे तुमच्यासाठी . एक सुर्वण संधी तुमची वाट बघत आहे
या वेबिनार मध्ये तुम्ही काय शिकणार
  1. लेखन कला कशी जोपासावी
  2. लेखन कलेचे सोपे तंत्र
  3. लेखक म्हणून विषय निवड कशी करावी ?
  4. पुस्तक चे मार्केटिंग कसे करावे .
  5. लेखक म्हणून एक करियर
  6. लेखन कलेचे फायदे.
  7. अजून बरंच काही...
Your Presenter
Girish Patil
लेखक व्हा आणि समृद्धी मिळवा
Happy Life
प्रा गिरीश सी .पाटील
प्राचार्य , अँम्रो ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् सायन्स अँड कॉमर्स .नाशिक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संचालित बहिःशाल शिक्षण मंडळ सल्लागार समिती सदस्य पदाचा अनुभव आहे
बहिःशाल शिक्षण मंडळाच्या माध्यमातून 'लेखन कलेचे तंत्र आणि मंत्र ' या विषयावर १८ वर्षांपासून वक्ता यानात्याने व्याख्याने दिली आहेत .या सोबत पत्रकारितेतील करियर संधी , विज्ञान विषयक दृष्टीकोन आणि आपण आदी विषयावरही १५० पेक्षा अधिक महाविद्यालयात व्याख्याने संपन्न . महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र 'कृष्णाकांठ ' या ग्रंथाचे " ग्रंथअन्वेषक "या नात्याने विविध महाविद्यालयामध्ये व्याख्याने .
वृत्तपत्र क्षेत्रात ३० वर्षांपासून सक्रिय आहेत . यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधील वृत्तपत्र पदविका अभ्यासक्रमासाठी " समंत्रक " म्हणून दिर्घ अनुभव . अक्षर सवांद आणि फिचर्स अँड सर्व्हिसेस माध्यमातून जिंगल लेखन आणि शब्दकोडे , कार्टून चा छंद जोपासून मुक्त पत्रकारिता सुरु आहे . प्रसार माध्यमात आज हि सक्रिय आहे .
गुजरात राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या प्राथमिक अभ्यासक्रमात " आम्ही खोडकर " या कवितेचा समावेश नुकताच करण्यात आला आहे . अक्षरबंध प्रकाशनाने "सवयी विषयी बोलू काही " आणि "सुविचार पुष्प " या दोन पुस्तकांचे नुकतेच प्रकाशन झाले आहे . या पूर्वी देखील 'स्मृतींचा झंझावात ' , सुगीचे दिवस आणि बापाचा सातबारा ' हे तीन मराठी काव्यसंग्रह प्रकाशित आहेत . "इंद्रधणुष्य " प्रेम सागर ', ' कोहिनूर ' 'माय 'व बाप 'इ प्रातिनिधिक काव्य संग्रहात कविता प्रसिद्ध . हिंदी आणि उर्दू रचना असलेला " गीत सुमित " ई बुक प्रसिद्ध .
गुरुब्रम्हा शिक्षक पुरस्कार , ग्रामीण साहित्य पुरस्कार सोबत १० विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे . दैनिके ,साप्ताहिके आणि मासिके यातून नियमित लेखन केले आहे . ५०० पेक्षा अधिक दिवाळी अंकांत साहित्य प्रसिद्ध . भारतीय पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष पदावर कार्यरत . सर्वस्पर्शी , शिक्षण तरंग , शिक्षणातील मर्मदृष्टी ,पोलीस टुडे आणि शाहू मराठा अशा १० पेक्षा अधिक नियतकालिकात सह संपादकाचा दीर्घ अनुभव.