यशाचा महामंत्र शिवतंत्र

About this webinar

[>> नमस्कार मित्रानो

छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे तंत्र वापरून यशस्वी झाले. त्याच तंत्राचा वापर करून आपण कसे यशस्वी होवू शकतो.तसेच आपला आत्मविस्वास १० पटीने कसा वाढवता येईल, तसेच जीवनातील यशाचे ७ सिद्धांत वापरून आधुनिकता,अध्यात्म आणि जीवनातील आनंद यांचा संयोग कसा साधावा हे जाणून घेण्यासाठी आपण माझ्या फ्री वेबिणार मध्ये जरूर सहभाग घ्यावा..


याविषयी बहुमूल्य मार्गदर्शन करणारा पावरफुल फ्री वेबिणार .. <<]

What you'll learn

[>> या वेबिणार मधे आपण काय शिकणार. यत्मविश्वास 10 पटीने वाढवा
यशाचे सात सिद्धांत
  • आध्यात्म,विज्ञान ,व आनद याची सांगड कशी घालाल .
  • तणाव मुक्त आयुष्य कसे जगायचे
  • निराशेतून बाहेर कसे पडायचे
आपल्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडवायचा असेल तर हा कोर्स मध्ये सहभागी व्हा. <<]
शिवशाहीर डॉ.विजय तनपुरे
Vijay Tanpure
यशाचा महामंत्र शिवतंत्र
SHIVASHRAM
जय हरी
महाराष्ट्राचे शाहीर आम्ही पोवाडे गाणार |
दुमदुमणारी शिवगर्जना ललकारीत जाणार ||
हे शाहीरी गाणे लिहून आपल्या शाहीरी शैलीत गाणारे राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाने शाहीरीमध्ये पाऊंल ठेवलेले राहुरीचे शिवशाहीर विजय तनपुरे हे महाराष्ट्राच्या लोककलेत आगळे वेगळे स्थान असणार्‍या शाहीरांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत.
विजय तनपुरे हे बालपणापासून पायाने अपंग असून त्यांनी शाहीरीमध्ये नावलौकीक मिळवत आपल्या अपंगत्वावर स्वकतृत्वाने मात केली आहे, जन्माला येऊन जगावेगळे करण्याचे स्वप्न सर्वच पहातात, परंतु प्रत्येक्षात फारच थोडे जण ती स्वप्ने पूर्ण करतात, ह्या त्यांच्या स्वप्न पुर्तीसाठी वेळ प्रसंगी प्रतिकुल परिस्थितीशी झुंज देण्याचीही तयारी ठेवतात, वयाच्या दुसर्‍या वर्षीच विजय यांना अपंगत्व आले, स्वतः रचना तयार करुन त्या खडया सुरेल आवाजात गाण्याची त्यांची शैली आहे.
नमन करीतो भारत मातेला |
टिळक गोखले आंबेडकराला ||
आठवूनी त्या शुर तान्हाला |
दादोजी बाजीप्रभूला जी जी जी ||
अशा स्वरचित पोवाड्यांनी रसिकावर छाप पाडणारे हे शाहीर वैयक्तीक आयुष्यात दु:खी आहे, कायमचे अपंगत्व घरची शेती त्याच्या व्यंगावर उपचार करण्यासाठे विकावी लागली, घरात गायानाचा वा इतर कलेचा कुठलाही वारसा नसतांना शाहीरी कलेत विजय यांनी चांगलीच झेप घेतली आहे, त्यांच्या या कलाक्षेत्रातील पदार्पणाला शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्यापासून प्रेरणा लाभल्याचे विजय सांगतात.
आज आपण बघत आहोत सामान्य पण असामान्य होणाऱ्या एका व्यक्तीची कहाणी
अतिशय कठीण प्रसंगांवर जणू काही एखाद्या माळरानात नंदनवन फुलावे,
एखाद्या डोंगरदऱ्यात दगडालाही पाझर फुटावा असे. अशा अविस्मरणीय व्यक्तीचे प्रेरणादायी जीवन चरित्र जर आपणास वाचायला मिळाले तर नक्कीच आपल्या जीवनाचं सोनं होईल. आज आपण अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल बघणार आहोत की ज्याचे यश कर्तुत्व वक्तृत्व दातृत्व हे अभिमानाने उंचावले आहे. नुसताच अभिमान नाही तर स्वाभिमानाने हे तितकेच प्रफुल्लीत. जीवन प्रवास एका संघर्षाचा, जीवनप्रवास एका लखलखत्या तार्‍याचा, जीवन प्रवास सामान्य घरात जन्मून पण असामान्य जीवन जगत असलेल्या एका महान व्यक्तीचे.
विश्व शिवशाहीर डॉ.विजय महाराज तनपुरे